ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांची अभिनेत्री दीपिका पादुकोणने जेएनयू परिसरात भेट घेतली. आपण या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचे तिने यावेळी सांगितले. त्यानंतर भाजपने दीपिकावर टीकास्त्र डागण्यास सुरूवात केली.
दीपिका पादुकोण ही तुकडे-तुकडे आणि अफझल गँगचे समर्थन करत आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका, असे आवाहन भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्ग यांनी केले आहे. तर काही सेलिब्रिटींनी दीपिकाचे कौतुक केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.
काल सायंकाळी जेएनयू परिसरात दीपिकाने 10 मिनिटे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचे यावेळी तिने सांगितले. मात्र, माध्यमांना प्रतिक्रीया देणे तिने टाळले.









