-एक कोरोना मृतदेह दहनासाठी मोजावे लागतात सुमारे सहा हजार
-आतापर्यंत केवळ पीपीई किटवर 25 लाख खर्च, -15 महिन्यांत 3500 कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार
विनोद सावंत/कोल्हापूर
कोरोना आजारातील व्यक्तींवरील खर्च मृत्यूनंतरही कायम असल्याची स्थिती आहे. शास्त्राsक्त पद्धतीने अंत्यसंस्कारासाठी कोरोना एका मृतदेहावर सहा हजारहून अधिक खर्च होत आहे. पहिल्या आणि दुसऱया लाटेमध्ये कोरोना मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी तब्बल 1 कोटी 64 लाख 60 हजार रूपये इतका खर्च झाला आहे. दीड वर्षात पंचगंगा स्मशानभूमीत 3 हजार 500 कोरोना मृतदेह दहन केले आहेत.
कोरोना रूग्णांवर हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी लाखो रूपये खर्च होत आहेत. साथ अटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून जिल्हा रूग्णालयासह कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोना रूग्णांवर मोफत उपचार दिला जात आहे. हा सर्व खर्च शासन उचलत आहे. काही गंभिर रूग्ण मात्र, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. लाखो रूपये खर्च करूनही काहीजण हाताला लागत नाही. त्यांच्या मृत्यूनंतरही हा खर्च कायम आहे. संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना मृतदेहावर शास्त्राsक्त पद्धतीने अंत्यसंस्कार करावे लागतात. एक मृतदेह दहनासाठी सहा हजारहून अधिक खर्च होत आहे.
महापालिकेवर सर्वाधिक भार
जिल्हÎातील बहुतांशी रूग्णांवर शहरात उपचार सुरू आहेत. येथे मृत्यू होणाऱयांचे दहन पंचगंगा स्मशानभूमीत केले जाते. याचा सर्व भार महापालिकेवर पडत आहे. आतापर्यंत कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारावर 1 कोटी 64 लाख 60 हजार खर्च झाला असून त्यामध्ये 1 कोटीहून अधिक खर्च महापालिकेचा झाला आहे.
मृतदेहांवर महापालिका अंत्यसंस्कार मोफत करते. जिल्हÎातील 3500 मृतदेहांसह पर जिल्हा, पर राज्यातील 300 हून अधिक मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीत दहन झाले आहेत. एका मृतदेहसाठी पीपीई किट, लाकूड, शेणी आणि गॅसचा खर्च सुमारे चार हजार होतो. तसेच शववाहिकाचे डिझेल, रॅपींग, ठोकमानावरील कर्मचारी पगार हा खर्च वेगळा आहे. सामाजिक संघटनाकडून शेणी, लाकूड, पीपीई किट दान स्वरूपातही जमा झाल्या आहेत. –अरविंद कांबळे, अधीक्षक, पंचगंगा स्मशानभूमी
कोरोना मृतांवर आतापर्यंत आलेला खर्च
स्मशानभूमी कर्मचारी पीपीई कीट -18 लाख
लाकूड, शेणी, गॅस -87 लाख 50 हजार
सॅनिटायझर – 10 हजार
शववाहिका चालक पीपीई किट -7 लाख 50 हजार
डिझेल खर्च -1 लाख 50 हजार
बॉडी रॅपींग -35 लाख
कर्मचारी पगार -15 लाख
एकूण -1 कोटी 64 लाख 60 हजार
कोरोना एक मृतदेहाच्या अंत्यसंस्कारसाठीच खर्च
खर्च रूक्कम
शववाहिकावरील कर्मचारी पीपीई किट 300
शववाहिका डिझेल खर्च 50
स्मशानभूमीतील दोन कर्मचारी पीपीई किट 600
बॉडी रॅपींग 1000
स्मशान, शववाहिका कर्मचारी वेतन 1550
लाकूड, शेणी किंवा गॅस 2500
एकूण 6000