अचूक बातमी “तरुण भारत” ची, सोमवार, 14 जून 2021, सकाळी 11.50
● बाधित वाढ घटल्याचा दिलासा ● जिल्ह्यात नवे फक्त 623 रूग्ण ● 24 तासात 5 हजार 592 चाचण्या ● 738 जणांची कोरोनावर मात ● मृत्यूदरही कमी होतोय ● जिल्हावासियांनी नियम पाळणे आवश्यकच
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात गेल्या आठवडाभर 800 ते 900 वर स्थिरावलेला कोरोना रूग्णवाढीचा आकडा सोमवारी 623 वर आला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्हावासियांना हा दिलासा मिळाला असला तरी जिल्हावासियांनी सार्वजनिक ठिकाणी नियम पाळणे आवश्यक आहे. दरम्यान गत 24 तासात 5 हजार 592 संशयितांच्या चाचण्या झाल्या यामधे 623 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या आकडेवारीनुसार आजचा पॉझिटिव्हिटी दर 8.97 टक्के एवढा राहिला आहे.
जून महिन्यात दिलासादायक वातावरण
2021 या वर्षातील एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढ रेकॉर्डब्रेक झाली होती. या वाढीने जिल्ह्यातील स्थिती अत्यंत भयावह झाली होती. मात्र जून महिन्याची सुरूवात दिलादायक झाली. दोन, अडीच हजारांचा आकडा जून महिन्याच्या सुुरूवातीला दीड हजारावर आला. नंतर तो 800 ते 900 पर्यंत स्थिरावला. आज तो 623 वर आला आहे.
नियंत्रण ठेवणे जिल्हावासियांच्या हातात
कोरोना रूग्णवाढीचा आकडा कमी होण्याचा दिलासा मिळत असून दुसरी लाट खरचं ओसरत असल्याचा दिलासा मिळत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले आहे. शिथिल झालेल्या लॉकडाऊनमधे जिल्हावासियांनी नियमांचे कडकपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य केल्यास रूग्णवाढीचा आकडा आणखी कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा वेगही वाढला असून प्रशासकीय यंत्रणेवरील ताणही काहीसा कमी होत आहे. त्यामुळे यापुढील काळात जिल्हावासियांनी नियमांच्या मर्यादेत राहण्याची आवश्यकता आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात एकूण बाधित 1,81223, एकूण कोरोनामुक्त 1,65,945, एकूण बळी 4,048, उपचारार्थ रुग्ण 10,708
रविवारी जिल्हय़ात बाधित 623, मुक्त 738, बळी 16









