प्रतिनिधी / बेळगाव
आपल्या लाडक्मया गणरायाची दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी दुपारनंतर निरोप देण्यात आला. यावषी कोरोनाचे संकट असल्यामुळे बऱयाच गणेश भक्तांनी दीड दिवसांच्या गणरायाला निरोप दिला. महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांवर सामाजिक अंतर राखत विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे विसर्जन सुरू होते.
शनिवारी सकाळपासून गणरायांची प्रति÷ापना करण्यात आली. यावषी साध्या पद्धतीने गणरायाचे आगमन झाले. गणरायाच्या आगमनामुळे मागील काही दिवसांपासून पसरलेली चिंता, दु:ख काहीसे दूर झाले. आता गणरायानेच यामधून मार्ग दाखवावा, अशी इच्छा गणेशभक्तांकडून व्यक्त केली जात होती. काही कुटुंबांमध्ये परंपरेनुसार दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे दीड दिवस भजन, कीर्तन कुटुंबातील सदस्य एकत्रित येऊन करीत असतात.
रविवारी दुपारी चार वाजल्यापासून बेळगावच्या कपिलेश्वर विसर्जन तलावावर गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक दाखल झाले होते. याचबरोबर जुने बेळगाव, अनगोळ, वडगाव, जक्कीनहोंड या परिसरात विसर्जनासाठी आलेले भाविक दिसत होते. यावषी कोरोनाची धास्ती असल्यामुळे अनेक भाविकांनी दीड दिवसांनी गणरायाला निरोप दिला. अनेकांनी आपल्या विहिरींमध्येच विसर्जन करणे पसंत केले. विसर्जन तलावांवर होणारी गर्दी पाहता अनेकांनी हा निर्णय घेतला.
दीड दिवसांच्या विसर्जनासाठी मनपा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी पोलीस तसेच मनपा कर्मचारी घेत होते. पाण्यात कोणीही उतरणार नाही याची दखल विशेषकरून घेतली जात होती. तशा सूचनाच गणेशभक्तांना दिल्या जात होत्या. नागरिकांनीही कुटुंबातील मोजक्मयाच व्यक्तींना घेऊन विसर्जन करणे पसंत केले.
सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन
यावषी कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही मंडळांनी दीड दिवसांच्या गणपतीची प्रति÷ापना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हुतात्मा चौक येथील गणेशोत्सव मंडळ व फोर्ट रोड व्यापारी बंधू गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणेशमूर्तींचे रविवारी विसर्जन करण्यात आले. कपिलेश्वर तलाव येथे या सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.









