रेल्वे प्रशासनाची धावाधाव,ट्रॅक दुरुस्तीचे मोठे आव्हान
प्रतिनिधी / खेड
कोकण रेल्वे मार्गवरून मुंबई येथून कर्नाटकला खत घेवून जाणाऱ्या मालगाडीचे मागील २ डबे घसरल्याची घटना दिवाणखवटीनजीक शनिवारी सायंकाळी ४ . ३० वाजण्याच्या सुमारास घडली . या अपघातात रेल्वे टॅक पूर्वतः उखडला असून ट्रेक दुरुस्तीचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर उभे ठाकले आहे . अपघातानंतर रेल्वे प्रशासनाची धावाधाव सुरू झाली . कोकण मार्गावरील नजीकच्या रेल्वे स्थानकातील सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले अपघाताचे नेमके कारण गुलदस्त्यातच आहे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कोकण मार्गावरून घावणाऱ्या प्रवाशी रेल्वेगाड्यांची वाहतूक ठप्प आहे . लॉकडाऊनचा कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची पूरक प्रमाणात उपलब्धता व्हावी , याकरिता मालवाहतुकीच्या रेल्वेगाड्या सुरू आहेत . याशिवाय आंबा वाहतुकीसाठी पार्सल ट्रेनही सुरू आहे . या पार्श्वभूमीवर मुंबईतून खताची वाहतुक करणारी मालगाडी कर्नाटकच्या दिशेने जात होती . ही मालगाड़ी दिवाणखवटी रेल्वे स्थानकातून मार्गच झाल्यानंतर स्थानकापासून ३ कि. मी. अंतरावर अचानक मागील 9 डबे घसरले.
ही बाब लोकोपायलच्या निरदर्शनास आल्यानंतर मालगाडी तातडीने थांबवली. मालगाडीचा मागील बाजुचे ९ डबे एकामागोमाग एक घसरल्याचे कळताच याबबत वरिष्ठांना कल्पना दिली. अपघातस्थळापासून काही अंतरावरील रेल्वेचे ट्रॅकही पूर्ण उखडला आहे. खताच्या पोत्यांनी भरलेले 9 डबे घसरल्यानंतर झालेल्या कर्णकर्कश आवाजाने नातूनगर व दिवाणखवटीतील ग्रामस्थ भयभीत झाले . मालगाडीला अपघात सात्याचे मत कापकना सर्वत्र पसरतच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली दिवाखवटी रेल्वे स्थानकातील कर्मचारीही तातडीने घटनास्थळी पोहचले.