प्रतिनिधी / फोंडा
गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी आणि प्रागतिक विचार मंच गोवा या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने दिवाकर शिंक्रे यांच्या सम्राट क्लबची यशोगाथा या पुस्तकावर चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम शनिवार 24 रोजी संध्याकाळी 4.30 वा. थ्रीफ्ट को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या सभागृहात होणार आहे. अशी माहिती प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जयवंत आडपईकर यांनी दिली. या पुस्तक चर्चेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोमंतकीय साहित्यिक तथा गोमंतक साहित्य सेवक मंडळचे अध्यक्ष रमेश वंसकर हे असतील या कार्यक्रमात कवि व पत्रकार राजू नाईक, साहित्तीक व जेष्ठ कथाकार विठ्ठल गावस, माधूरी शेणवी उसगावकर या भाग घेऊन पुस्तकावर भाष्य करणार आहेत. चर्चेच्या कार्यक्रमाचे सुरवातीला दिपप्रज्वलीत करून उद्घाटन केले जाणार आहे. पुस्तकाचे लेखक दिवाकर शिंक्रे, जयवंत आडपईकर, थ्रीफ्ट सोसायटीचे व्यवस्थापक साळभगत हे या वेळी उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमात साहित्य रसिक उपस्थित रहावे असे आवाहन जयवंत आडपईकर यांनी केले आहे.









