
प्रतिनिधी /पणजी
राज्यात कोरोनाबळींची संख्या पुन्हा एकदा अचानकपणे वाढत रविवारी तब्बल 5 जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्याशिवाय नव्याने 72 बाधित सापडले. सध्या राज्यात 900 सक्रिय रुग्ण आहेत तर 24 तासात 89 जण कोरोनामुक्त झाले आहेत. वर्षभरातील एकुण मृतसंख्या 3208 एवढी झाली आहे.
रविवारी एकूण 5374 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 72 बाधित सापडले. त्यापैकी 22 जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले, 50 जणांना गृह विलगिकरण देण्यात आले तर 7 जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत वर्षभरातील एकूण बाधितसंख्या 174419 तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 170311 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 97.64 टक्क्यांवर पोहोचले आहे.
रविवारी मृत्यू झालेल्या पाच रुग्णांपैकी तिघांवर गोमेकॉत तर दोघांवर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू होते. मृत्यू आलेल्यात एक पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे. ते सर्वजण 52 ते 96 वर्षे वयोगटातील होते.









