ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात केवळ 305 नवे रुग्ण आढळून आले असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 560 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 30 हजार 433 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 01 हजार 473 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर 24,748 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून राजधानीत रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.41% इतका आहे.
- 4,212 रुग्णांवर उपचार सुरू
सद्य स्थितीत 4 हजार 212 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 2,320 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. कोविड केअर केंद्रात 122 जण आहेत. तर 1369 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 00 लाख 42 हजार 178 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 53,266 आरटीपीसीआर टेस्ट आणि 21,867 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 9,547 झोन आहेत.
- लसीकरणाचा डाटा
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 48,022 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 25,537 जणांना पहिला डोस तर 22,485 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 58 लाख 29 हजार 167 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 44,66,004 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 13,63,163 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.