ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात केवळ 54 नवे रुग्ण आढळून आले. तर, दिल्लीतील संसर्गाचा दरात घट झाला असून 0.9 % इतका झाला आहे. कालच्या दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर 132 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्य स्थितीत राज्यात 912 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 34 हजार 608 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 08 हजार 699 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर 24,997 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- आतापर्यंत 83 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 9503 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 5651 जणांना पहिला डोस तर 3852 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 83 लाख 89 हजार 161 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 64,77,469 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 19,11,692 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे
दिल्ली : कोरोनाची 5 जुलैची आकडेवारी
- नवीन रुग्ण : 54
- मृत्यू : 02
- सक्रिय रुग्ण : 912
- बरे झालेल्यांची संख्या : 132