वृत्तसंस्था/ गुवाहाटी
येथे सुरू झालेल्या 103 व्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी ई गटातील झालेल्या चुरशीच्या सामन्यात दिल्ली एफसी संघाने हेद्राबाद एफसी संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले.
या सामन्यात सहाव्या मिनिटाला दिल्ली एफसीचे खाते हिमांशू जांगराने उघडले. मध्यंतरापर्यंत दिल्लीने हैदराबादवर 1-0 अशी आघाडी घेतली. 57 व्या मिनिटाला रामलुचुंगाने हैदराबाद एफसीला बरोबरी साधून दिली. या सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. आता या स्पर्धेत ह हैदराबादचा पुढील सामना चेन्नईन एफसी संघाबरोबर मंगळवारी तर दिल्ली एफसीचा पुढील सामना त्रिभुवन आर्मी एफसी नेपाळ संघाबरोबर येत्या बुधवारी खेळवला जाणार आहे.









