ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट करत हे आवाहन केले आहे.
मोदी आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या भावांना आणि बहिणींना आवाहन करतो की, त्यांनी कायम शांतता आणि बंधुता जपावी. दिल्ली शहर शांत रहावं आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावं हे जास्त महत्वाचं आहे. तसेच पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
दरम्यान, उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 67 पोलिसांसह 200 जण जखमी झाले आहेत. हिंसाचारग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून, दंगेखोरांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.









