नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीसह उत्तरेकडील पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास काही भागात पर्जन्यवृष्टी झाल्याने त्रेधा उडाली. बोचऱया थंडीसोबतच पाऊसधारा कोसळल्याने शेतकरी आंदोलनालाही फटका बसला. पश्चिमी वाऱयांचा परिणाम दिल्लीसह उत्तर-पश्चिम भारतात जाणवल्यामुळे हा पाऊस झाल्याचे स्पष्टीकरण हवामान विभागाने दिले आहे. दिल्लीत शनिवारीही किरकोळ पाऊस झाला होता. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे तापमानात आणखी घट झाली आहे.
उत्तर भारतात थंडीसोबतच अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्मया सरी बरसल्या. दिल्लीत रविवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली होती. पावसानंतर हिमाचल प्रदेशच्या केलांगमध्ये तापमान शून्याच्या खाली घसरले आहे. हवामान विभागाने येत्या 2-3 दिवसांपर्यंत मुसळधार पावसाची शक्मयता वर्तवली आहे. या पावसामुळे गारठा वाढू शकतो. दिल्ली-एनसीआरमध्ये 3, 4 आणि 5 जानेवारीला मुसळधार पाऊस होईल, तसेच, गारपीटीची शक्मयता आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, पंजाबमध्ये येत्या दोन दिवसात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे थंडीत वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जम्मू काश्मीर, हिमाचलमध्ये हिमवृष्टी
हिमाचल प्रदेशमध्ये शनिवारपासूनच अनेक ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टी सुरू आहे. तसेच उत्तर काश्मीरमध्ये हलक्मया स्वरुपाची तर मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये मध्यम स्वरुपाची हिमवृष्टी झाली. काश्मीर खोऱयातील डोंगराळ भागांमध्ये मध्यम स्वरुपापेक्षा जास्त हिमवृष्टी झाली. श्रीनगरमध्ये तीन-चार इंचाचे बर्फाचे थर रस्त्यावर साचले. काजीगुंड येथे नऊ इंच हिमवृष्टी झाली. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये पाच ते सहा इंचाचे बर्फाचे थर रस्त्यावर साचले. कोकेरनाग येथे नऊ इंच हिमवृष्टी झाली. उत्तर काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमर्गमध्ये चार इंच हिमवृष्टी झाली. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर जवाहर बोगद्याजवळ दहा इंच बर्फाचे थर रस्त्यावर साचले होते.
शेतकऱयांच्या आंदोलनाला फटका
गेल्या जवळपास सव्वा महिन्यापासून पंजाब, हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले असून त्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. ट्रक्टर-ट्रॉली किंवा कापडी छत उभारून आंदोलन करणाऱया शेतकऱयांना अचानक कोसळलेल्या पावसाचा अंदाज नव्हता. त्यामुळे त्यांचे कपडे, अंथरुण-पांघरुण यासह धान्य आणि इतर साहित्य पावसात ओलेचिंब झाल्याचे दृष्य ठिकठिकाणी दिसून येत होते. ऐन थंडीच्या कडाक्यात हा पाऊस झाल्याने सर्वांचीच धावपळ उडाली.