ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दोन लाखांच्या लाचप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या ओएसडीला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने रंगेहात अटक केली आहे.
गोपाल कृष्ण माधव असे या अधिकाऱयाचे नाव आहे. ते 2015 पासून मनिष सिसोदिया यांच्या कार्यालयात काम करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री उशीरा जीएसटी संबंधित एका प्रकरणात दोन लाखांची लाच स्विकारताना गोपाल कृष्ण यांना सीबीआयने रंगेहात पकडले. त्यांची सीबीआयच्या मुख्यालयात सध्या चौकशी सुरू आहे. याप्रकरणात सिसोदिया यांची कोणतीच भूमिका अद्याप समोर आली नाही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. त्याची तयारी झाली असून, 11 फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल.









