अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 29 ऑक्टोबर 2021, सकाळी 11.15
● पाच महिन्यातील सर्वाधिक कमी संसर्गदर
● 24 तासात संशयितांच्या 3707 चाचण्या
● जिल्हभरात फक्त 37 रूग्ण वाढले
● आक्टोंबर महिन्याने सावरले
● दिपावलीपूर्वी जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा लखलखाट
सातारा / प्रतिनिधी :
दिपावलीच्या आकाशदिव्यांंचा लखलखाट चार दिवसांवर आला असतानाच सातारा जिल्ह्यावासियांना सुखावणारा शुभसंकेत मिळाला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 3 हजार 707 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून अवघे 37 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या आकडेवारीवरून पॉझिटिव्हीटी 1 वर घसरली आहे. गेल्या पाच महिन्यातील हा सर्वात कमी पॉझिटिव्हीटी रेट असून जिल्हा कोरोनाच्या जोखडातून आणखी सावरत असल्याचा हा संकेत आहे. या संकेतामुळे कोरोनाच्या अंधकाराकडून दिपावलीच्या प्रकाशमय, उत्साही वातावरणाकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
सप्टेंबर सु:खद तर आक्टोंबर लाभदायक
जिल्ह्यात ऑगस्ट 2021 च्या 30 तारखेपर्यंत कोरोनाचे संकट गडद होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी रूग्णवाढीचा आलेख 564 पर्यंत खाली घसरला. सप्टेंबर महिन्यातील फक्त चार दिवस वगळता रूग्णवाढ पाचशेच्या खालीच होती. आक्टोंबर महिना उजाडल्यावर जिल्ह्याची रूग्णवाढ पहिल्याच दिवशी 198 वर आली. त्यानंतर रूग्णवाढीचा आलेख घसरत गेला.
चाचण्यांची संख्या तिप्पटीने कमी
सप्टेंबर महिन्यात 10 हजार 356 पर्यंत होणारी चाचण्यांची संख्या आक्टोंबर महिन्यात तीन हजारापर्यंत खाली घसरली. आक्टोंबरमधे 5 आक्टोंबरला 224, 6 आक्टोंबरला 222 वगळता कोरोना रूग्णवाढ 200 खाली राहिली आहे. 24 आक्टोंबरला 34 तर 25 आक्टोंबरला 33 आणि 29 आक्टोंबरला 37 म्हणजे 50 च्या खाली घसरली आहे.
पॉझिटिव्हीटी रेट घसरल्याने दिलासा
आक्टोंबर महिन्यात 28 दिवसात जिल्ह्यात 2 हजार 866 रूग्णांची वाढ झाली आहे. या चालू महिन्यात निर्बंध शिथिल असताना आणि वातावरणात कमालीचा बदल होत असतानाही पॉझिटिव्हीटी रेट कमी राहिला आहे. 3 आक्टोंबरला सर्वाधिक 4.16 पॉझिटिव्हीटी रेट होता. त्यानंतर पॉझिटिव्हीटी रेट दोन ते अडीच टक्क्यांच्या खाली घसरला आहे. विशेष म्हणजे आज शुक्रवारी आलेल्या अहवालात पॉझिटिव्हीटी रेट सर्वात कमी म्हणजे फक्त 1 टक्क्यांवर आला आहे. दिपावलीच्या आनंददायी वातावरणाची चाहूल लागली असतानाच जिल्हावासियांना मिळालेला हा शुभसंकेत मानायला हवा.
गुरुवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,20,608
एकूण बाधित 2,51,145
कोरोनामुक्त 2,43,340
एकूण मृत्यू 6,424
सक्रीय रुग्ण 559
गुरूवारी जिल्हय़ात
बाधित 37
मुक्त 74
मृत्यू 00, उशिरा नोंद 05









