ऐगळी पोलिसांची कारवाई, कोकटनूर येथे घडली होती घटना : विहिरीच्या पाण्याच्या वाटणीवरून वाद
प्रतिनिधी / बेळगाव
कोकटनूर, ता. अथणी येथील एका दाम्पत्याला झोपेत असतानाच रॉकेल ओतून पेटविल्याच्या आरोपावरून त्याच गावातील तिघा जणांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. ऐगळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शंकर सदाशिव मादर, सदाशिव सिद्राम मादर, सुनील सदाशिव मादर तिघेही राहणार कोकटनूर अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अथणीचे पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक शंकरगौडा बसनगौडर, ऐगळीचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर सौदी, एम. ए. आळंद, एम. बी. दोडमनी, ए. ए. इरकर, बी. बी. पाटील, एम. एम. खोत, एस. एस. बबलेश्वर, ए. सी. मुजावर, गिरीमल्ल दोडमनी, मुरली दोडमनी आदींनी ही कारवाई केली आहे. 11 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. महादेव सिद्राम मादर (वय 50), त्याची पत्नी रेखा महादेव मादर (वय 45) हे दोघे झोपेत असताना त्यांच्यावर रॉकेल ओतून त्यांना पेटविण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता या दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. शेतातील विहिरीच्या पाण्याच्या वाटणीवरून ही घटना घडली होती. याप्रकरणी मृतांच्या भाऊबंदातील तिघा जणांना अटक करण्यात आली









