प्रतिनिधी /फातोर्डा
पलाश अग्नी स्टुडियोजने आपल्या नव्या ऑडियो-व्हिज्युयल स्टुडियोच्या उद्घाटन सोहळय़ाच्या निमित्ताने ह्या वर्षाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले ज्येष्ठ साहित्यीक दामोदर (भाई) मावजो ह्यांच्याशी ‘रायटर आणि फायटर- एक प्रवास’ ह्या विषयावर एका ‘फोन ईन’ संवादाचे आयोजन केले आहे.
दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जगभरच्या साहित्य प्रेमींना पहिल्यांदाच त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ह्या कार्याक्रमात प्रसिद्ध सूत्रसंचालक आणि रवीन्द केळेकर ज्ञानमंदीरचे मुख्याध्यापक अनंत अग्नी हे मावजो यांची मुलाखत घेतील.
कार्यक्रम मंगळवार, दि 14 रोजी संध्याकाळी 6 वाजता पलाश अग्नी स्टुडियोजच्या फेसबूक पेजवरून थेट प्रक्षेपीत करण्यात येईल. ज्यांना ह्या कार्यक्रमा दरम्यान भाईना त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी प्रश्न विचारायचे असतील त्यांनी 8788728784 ह्या क्रमांकांवर थेट संपर्क साधण्याचे पलाश अग्नी ह्यानी कळविले आहे.









