प्रतिनिधी / दापोली
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी मूळ सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील विद्यार्थी श्रीकांत खांडेकर यांनी यूपीएससी परीक्षेत 231 वा क्रमांक पटकावला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रीकांत खांडेकर हे शेतकरी कुटूंबातील आहेत. त्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातून 2016 मध्ये वर्षी बी. टेक. ची पदवी संपादन केली होती. दापोली येथे बी. टेक. करून एम. टेक करण्यासाठी ते भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, दिल्ली येथे गेले. त्यानंतर त्यांनी 2018 रोजी यूपीएससी प्रवेश पूर्वपरीक्षा दिली. ऑक्टोबर 2019 मध्ये अंतिम परीक्षा दिल्ली येथे झाली. तीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात त्यांनी हे यश मिळवले. याआधी त्यांनी कृषीची गेट परीक्षा दिली. यात देखील ते दुसऱ्या रँक मध्ये उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांची भारतीय फॉरेस्ट सेवेत निवड झाली. सध्या ते बिहार येथे याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे दापोली विद्यापीठात कौतुक होत आहे.









