प्रतिनिधी/ रत्नागिरी
दापोली तालुक्यातील 65 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े यामुळे कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांचा आकडा 340 पर्यत पोहचला आह़े तर सोमवारी जिह्यामध्ये नव्याने केवळ 11 कोरोनाचे रूग्ण मिळून आले आह़े तर 16 बरे झालेल्या रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल़ा
जिह्यामध्ये सोमवारी करण्यात आलेल्या 155 कोरोना चाचण्यांपैकी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 6 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 5 कारोनाबाधित रूग्ण मिळून आल़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 5, दापोली 1, चिपळूण 2, संगमेश्वर 1 व लांजा 2 असे रूग्ण मिळून आले आहेत़ यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 9 हजार 406 इतकी झाली आह़े तर मागील 24 तासात 16 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़ कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 8 हजार 951 वर पोहचले आह़े जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 95.16 इतके आह़े
मृतांच्या तालुकानियाह आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक 91, खेड 52, गुहागर 12, दापोली 36, चिपळूण 82, संगमेश्वर 35, लांजा 12, राजापूर 17 तर मंडणगडमध्ये 03 असे एकूण 340 जणांचा आतापर्यंत कारोनामुळे मृत्ये झाला आह़े









