दापोली / प्रतिनिधी
दापोली शहरातील मेहता पेट्रोल पंप रविवारी रात्री साडेनऊ वाजता डिझेल भरण्यासाठी आलेल्या एका खाजगी बसने डिझेल भरत असताना अचानक पेट घेतला यामुळे शहरात एकच धावाधाव उडाली.
गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने गाडीतून पळ काढला तसेच गाडीतील प्रवासी देखील उतरून निघून गेले मात्र यावेळी झालेल्या स्फोटांमध्ये पेट्रोल पंपातील कर्मचारी राजू भुवड हा जखमी झाला त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
सदर चालकाने गाडी पेटल्यानंतर पळ काढल्यावर पेट्रोल पंपाचे मालक आशिष मेहता यांनी स्वतः बसमध्ये बसून बस पंपाच्या बाहेर घेण्याचा प्रयत्न केला मात्र बस पंपाच्या दारात आल्यावर बस अचानक लॉक झाली यानंतर पंपात असणार्या अग्निशमन उपकरणांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला यानंतर दापोली नगरपंचायतीच्या आलेल्या बंबाने बसच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले