साहित्य : 1 वाटी उडीद डाळ, 2 वाटी दही, 2 चमचे जिरे पावडर, आवश्यकतेनुसार लाल तिखट पावडर, चवीनुसार मीठ, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, तळण्यासाठी तेल
कृती : प्रथम उडीद डाळ धुवून पाच ते सहा तास पाण्यात भिजत घालावी. नंतर निथळून आवश्यकतेनुसार पाणी व हिरवी मिरची घालून मिक्सरला लावून मध्यमसर पेस्ट बनवावी. तयार पेस्ट बाऊलमध्ये काढून चांगली फेटावी. नंतर त्यात मीठ घालावे. गॅसच्या मध्यम आचेवर कढईत तेल गरम करावे. तेल चांगले गरम झाले की आच मंद करून तयार मिश्रणाचे छोटे वडे बनवून गरम तेलात सोडावेत. वडे हलक्या सोनेरी रंगावर तळून पेपरनॅपकीनवर काढावेत. बाऊलमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात वडे ठेवावेत. हाताने दाबून त्यातील पाणी काढावे. दुसऱया बाऊलमध्ये दही घेऊन त्यात मीठ मिक्स करावे. वडा बाऊलमध्ये घेऊन त्यावर दही, लाल तिखट पावडर, जिरे पावडर, चिंचेची गोड चटणी आणि पुदिना चटणी घालून खाण्यास द्यावे.









