प्रतिनिधी / सातारा :
सातारा तालुक्यातील वडूथ व आरळे गावांमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडू 25 घरफोडी तसेच चोरीचे गुन्हे उघडीस आले असून सातारा तालुका व कराड शहर पोलीस ठाण्यात या तिन संशयितांवर गुन्हे दाखल आहेत.
नाना पाटेकर उर्फ यश भाऊबीज उर्फ भावज्या उर्फ बाबू भोसले उर्फ काळे (वय 19, रा. आसनगाव, ता. जि. सातारा), सुर्यगन उर्फ गाल्या शेज्या भोसले (वय 20, रा. आरफळ, ता. जि. सातारा) व अतिक्रमण विजय काळे (रा. रेवडी, ता. कोरेगाव) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तीघा संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा जिल्हयात दाखल होणारे दरोडे, घरफोडया चोऱया उघडकीस आणण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक तयार केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि. 15 रोजी सातारा ते लोणंद रस्त्यावर पेट्रालिंग करीत असताना रात्री 11.10 वाजण्याचे सुमारास वडुथ (ता. जि. सातारा) गावचे हद्दीतील कृष्णा नदीचे पुलावर काही इसम अंधारामध्ये संशयास्पद स्थितीत तोंड बांधलेल्या अवस्थेमध्ये उभे असलेले दिसले. त्यांच्या हाचलचाली संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड व सोबत असणारे पोलीस पथकाने त्यांच्या जवळ जावून कानोसा घेतला असता त्यांचेमध्ये वडुथ व आरळे गावामध्ये वस्तीवर एकांतातील घरातील लोकांना मारहाण व दमदाटी करुन चोरी करायची असे बोलणे ऐकले. त्यावेळी तत्काळ पोलिसांनी त्यामधील दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे घरफोडी करण्याची साधने/हत्यारे मिळून आली. त्यांचेविरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान एक वर्षापुर्वी यातील मुख्य संशयित आरोपी व त्याचे साथिदाराने वाढे (ता. सातारा) येथील मुथा यांचे वस्तीवरील घरामध्ये दरोडा टाकला होता. नमुद गुन्हयातील चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आलेले आहेत. गुन्हयाचे तपासामध्ये अटक आरोपींचेकडे विचारपुस करता त्यांनी कराड, कोरेगाव,
वाढे, शिवथर, बोरगाव गावामध्ये एकूण 25 घरफोडया केल्या असल्याची माहिती दिली आहे.









