मार्केट पोलिसांची कारवाई, घातक शस्त्र जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या पाच तरुणांना येथील मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. महाद्वार रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्या जवळून तलवारी, बटण चाकू आदी घातक शस्त्रs जप्त करण्यात आली आहेत.
मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून संबंधितांविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. अटक करण्यात आलेले सर्व पाच जण महाद्वार रोड परिसरातील आहेत.
दरोडय़ाच्या तयारीसाठी महाद्वार रोड, दुसरा क्रॉस परिसरातील एका खोलीत ते तरुण एकत्र आले होते. त्यांच्या जवळून तीन तलवारी, दोन बटण चाकू व इतर शस्त्रsही होती. या संबंधितीची माहिती मिळताच अचानक छापा टाकून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
अमलीपदार्थांच्या नशेत तरुणाई
गांजा व इतर अमलीपदार्थांच्या नशेत तरुणाई गुन्हेगारीत उतरु लागली आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत काही अमलीपदार्थांचे विपेते तरुणाईला नशेतच्या खाईत ढकलण्याचे काम करु लागले आहेत. बहुतेक गुन्हेगारी प्रकरणांत अटक केलेले तरुण गांजाच्या नशेत असलेले आढळू लागले आहेत. त्यामुळे तपास अधिकाऱयांनाही धक्का बसला आहे. सोमवारी अटक करण्यात आलेल्या पाच जणांना न्यायालयासमोर हजर करण्यासाठी प्रक्रिया सुरू होती.









