14 तास नव्हते पाणी : हँड ग्लोज, मास्क परिसरात पडलेत : रुग्णाना मिळेना सुविधा : निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांची कार्यकर्त्यांनी घेतली उलट तपासणी
प्रतिनिधी / सातारा
मोठय़ा अपेक्षेने बाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी सातारा येथें जंबो हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सुरू करण्यात आले.मात्र, या रुग्णालयात काल रात्री आठ ते सकाळी 10 पर्यंत पाणी नव्हते.रुग्ण आणि नातेवाईक व तेथील कर्मचायांनी पाण्याच्या टंचाई बाबत खेद व्यक्त केला.तसेच एका नातेवाईकाने भाजपच्या जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार यांच्याकडे तक्रार केली.निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्यासमोर पुरावे सादर करून प्रशासनाच्या कारभाराची लक्तरे मांडली. पालिकेच्या टँकरने सकाळी साडे दहा वाजता पाणी पुरवठा करण्यात आला.त्यामुळे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे दोन दिवस सातारा दौयावर येत आहेत.त्यांनी आवर्जून या जंबो हॉस्पिटलमध्ये नक्की काय चालते ते पहावे अशी मागणी होऊ लागली आहे.
कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना त्यास अटकाव करण्यासाठी आणि बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी जंबो हॉस्पिटल सुरू करण्याची घोषणा झाली.अन ते हॉस्पिटल सुरू ही झाले.या हॉस्पिटलमध्ये सध्या यंत्रणा पुणे येथील खाजगी रुग्णालयातील आहे.मोठय़ा थाटात ऑन लाईन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या हॉस्पिटलचा प्रारंभ झाला.या रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत.ज्या प्रकारे उपचार द्यायला हवेत तसे दिले जात नाहीत, असा आरोप होऊ लागला आहे.या हॉस्पिटलमध्ये काल रात्री आठ वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजे पर्यंत पाणी नव्हते.या गैरसोयीमुळे रुग्णालयात असलेल्या रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी यांची गैरसोय झाली.विशेष म्हणजे या रुग्णालयात रुग्णाना सकाळी प्रातविधीला जाण्यासाठी शौचालयात पाणी नसल्याने गैरसोय झाली.एकतर मोठय़ा विश्वासाने कोरोना बाधित रुग्ण चांगला उपचार होईल म्हणून जंबो हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत.परंतु तेथे होत असलेल्या गैरसोयीबाबत नातेवाईकांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार यांच्याकडे तक्रार केली.बलशेठवार यांनी त्या रुग्णालयात होत असलेल्या गैरसोईबाबत अगोदर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांच्या बाब निदर्शनास आणून दिली.आज सकाळी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्याकडे पुरावे सादर करून पंचनामा केला.त्यांच्याकडून चुकीची उत्तरे येताच चांगले फैलावर घेतले.त्यांनंतर पालिकेच्या छोटय़ा टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला.दरम्यान, रुग्णालयातल्या कर्मचायांकडून ही हँड ग्लोज मास्क कसेही टाकून कोरोना वाढवण्यासाठी चालना दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे दोन दिवसांच्या दौयावर सातायाला येत आहेत.त्यांनी सातारच्या या जंबो हॉस्पिटलला भेट देऊन नक्की कशी गैरसोय होते त्याचा पर्दाफाश करावा, अशी मागणी रुग्ण आणि नातेवाईक यांच्याकडून होत आहे.
जंबो हॉस्पिटलमध्ये पाणी आहे.आम्ही प्रत्येक वॉर्डात पाण्याच्या बाटल्या दिलेल्या आहेत.कोणतीही गैरसोय होत नाही.चांगली सुविधा रुग्णांना दिली जात आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.