वार्ताहर/ कुडाळ
अल्पवयीन मुलीच्या नवजात बालकास दत्तक घेणारे सुनिल हिरालाल चौरसीया ,पूनम सुनील चौरसिया रा. कांदिवली,मुंबई याना शुक्रवारी रात्री मालाड पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यांना आज मुंबई येथे महाबळेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले व आज महाबळेश्वर येथे आणण्यात आले होते या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या कुटूंबातील एका सदस्याला देखील महाबळेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले या तीनही जणांना आज सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर ऍड प्रभाकर हिरवे व संजयकुमार जंगम याना आज न्यायालयीन कोठडी मिळाली आहे
या प्रकरणात आतापर्यंत मुख्य दोन संशयितांसह एकूण सात जण पोलिसांच्या ताब्यात घेतले होते तर नवजात बालकाच्या दत्तक प्रकरणात सहभागी असलेले इतर संशयित सनी उर्फ सत्चित दत्तात्रय बावळेकर,योगेश दत्तात्रय बावळेकर रा महाबळेश्वर,आनंद हिरालाल चौरसीया रा कांदिवली मुंबई,मंजुर रफिक नालबंद रा.महाबळेश्वर,अनुभव कमलेश पांडे रा उत्तर प्रदेश सध्या महाबळेश्वर,घनश्याम फरांदे रा.तामजाई नगर,सातारा अश्या सहा संशयितांचा महाबळेश्वर पोलीस कसून शोध घेत आहेत









