ऑनलाईन टीम / पुणे :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारताचा 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोतवाल चावडी येथे झेंडावंदन कार्यक्रमासह परिसरातील नागरिकांना 75 किलो पेढे वाटून स्वातंत्र्यदिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झाला.
ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी सचिन आखाडे, प्रकाश ढवळे, निखिल मालुसरे, पराग वांबुरे, श्रीराज रासने, विशाल ढनाल, सिद्धेश आखाडे, नितीन आंबवले व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
झेंडावंदन नंतर बेलबाग चौकात नागरिकांना व बस-रिक्षा अशा वाहनांतून जाणा-या प्रवाशांना देखील पेढे वाटण्यात आले. सर्व कार्यकर्त्यांनी मिळून फुलांची व रांगोळीची सुंदर आरास केली होती. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून हा कार्यक्रम करण्यात आला.








