मोठय़ा प्रमाणात पडझड बऱयाच भागात वीज पुरवठा गायब

प्रतिनिधी / मडगाव
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे तौक्ते वादळ निर्माण झाले असून या वादळाने शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर दक्षिण गोव्याला जबरदस्त दणका दिला. अनेक घरांवर वृक्ष कोसळे असून त्यामुळे लोकांना फटका सहन करावा लागला आहे. दक्षिण गोव्यातील बऱयाच भागात वीज पुरवठा खंडित झाला असून काल रात्री उशिरा पर्यंत तो सुरळीत झाला नव्हता. कोरोना महामारीच्या काळात आलेल्या या वादळाने लोकांसमोर आणखीन अडचणी निर्माण केलेल्या आहेत.
काणकोण तसेच सासष्टीच्या समुदकिनाऱयावर मोठय़ा लाटा येऊन धडकू लागल्याने वाळूचे पट्टे देखील उध्वस्त झाले. कोलवा, बाणावली, केळशी, उतोर्डा पर्यंतच्या किनारपट्टी भागात महाकाय लाटाचे तांडव काल निर्माण झाले होते. यावेळी सुटलेल्या जबरदस्त वाऱयाने सर्वत्र पडझड झाली. वीज खात्याचे कर्मचारी दिवस-रात्र राबवून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नरत होते. काही भागात वीज पुरवठा सुरूळीत करण्यात आला तरी बराच भाग शनिवार व रविवार सलग दोन दिवस अंधारात राहिला.
वीज खात्याच्या कर्मचाऱयांनी घो-घो पडणाऱया पावसाची तमा न करता, दुरूस्तीचे काम हात घेतले होते. काही कर्मचाऱयांना दिवसभर जेवण सुद्धा नाही मिळाले तर चहा सुद्धा. त्याच पद्धतीने अग्नीशामक दलाचे कर्मचारी रस्त्यावर तसेच घरावर पडलेली झाडे कापून बाजूला करण्यात गुंतले होते. घरावर व रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यासाठी त्यांना सातत्याने फोन येत होते. थोडी सुद्धा उसत न घेता त्यांनी काम केले.
शनिवार रात्री पासूनच वीज पुरवठा खंडित झाल्याने तसेच रविवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित राहिल्याने अनेक व्यापाऱयांना फटका बसला. कोल्ड स्टोअरेज व फ्रीज मध्ये ठेवलेल्या आईस्क्रीम, दूध, मासे, इत्यादी जीवनावश्यक वस्तू खराब होण्याचे प्रकार घडले. काही ठिकाणी तर एकदा सुरळीत केलेला वीज पुरवठा पुन्हा खंडित होण्याचे प्रकार घडले.
दरम्यान, कोकण रेल्वेच्या मार्गावर देखील पडझड झाली. मात्र, रेल्वेच्या कर्मचाऱयांनी त्वरित हालचाल करून रेल्वे मार्ग पुन्हा सुरळीत केला. तौक्ते वादळाने आक्रमक रूप धारण केल्याने, काल कोकण रेल्वेने आपली एक गाडी रद्द केली. मात्र, उर्वरित गाडय़ा सुरळीत रित्या सुरू होत्या.
दामू नाईक पोचले मदतीला
मडगाव पालिकेच्या प्रभाग 7 मध्ये शनिवारी रात्री 11 वा. नागवेकर यांच्या घरावर वृक्ष केसळला. त्यामुळे या कुटुंबाला धोका निर्माण झाला होता. ही माहिती फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांच्या पर्यंत पोचताच, त्यांनी घटनास्थळी भेट दिली व नागवेकर कुटुंबियांची सुटका करण्यासाठी पुढाकार घेतला. अग्नीशामक दलाला प्राचारण करून घरावर पडलेला वृक्ष हटविला व सर्वांची सूटका केली. यावेळी स्थानिक नगरसेविका मिलाग्रीन डायस उपस्थितीत होत्या.
मोडी डोंगरावर टीबी हॉस्पिटलजवळ वृक्ष कोसळला
सद्या कोरोनाची लस दिली जात असलेल्या टीबी हॉस्पिटलाजवळ काल एक वृक्ष कोसळला. त्यामुळे काही वेळ समस्या निर्माण झाली. याची माहिती मिळताच मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी घटनास्थळी भेट देऊन अग्नीशामक दलाच्य सहाय्याने हा वृक्ष हटविण्यास पुढाकार घेतला.राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी वृक्ष कोसळून पडले ते हटविण्याचे काम अग्नीशामक दलाने हाती घेतले होते.









