भारत हा अपघातांप्रकरणी जगात पहिल्या स्थानावर आहे. पण ड्रायव्हिंगसाठी धोकादायक देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर नाही. जागतिक कंपनी जुटोबीने ड्रायव्हिंगसंबंधी 56 देशांमध्ये अध्ययन केले आहे. या अध्ययनानुसार दक्षिण आफ्रिकेतील रस्ते सर्वात धोकादायक आहेत. तेथे रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या 57 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तेथे दर 1 लाख चालकांमध्ये मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या 36 इतकी आहे.
दक्षिण आफ्रिकेनंतर थायलंडचा क्रमांक लागतो. येथे दर एक लाख चालकांमागे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या 32.7 आहे. या देशात मद्यपान करून वाहन चालविण्यावर कठोर बंदी नसणे तसेच रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब असणे हे यामागील कारण आहे. तसेच देशात सातत्याने पर्यटक येत असतात, जे कायद्यांचे पालन न करत रस्त्यांवर वाहने चालवित असतात.
महासत्ता असलेला अमेरिकाही ड्रायव्हिंगप्रकरणी जगातील तिसरा सर्वात असुरक्षित देश आहे. येथे मद्यपान करून वाहन चालविल्यास दंडाची तरतूद आहे, पण त्याचे कठोर पालन केले जात नाही. अमेरिकेतील अनेक प्रांतांमध्ये प्रतितास 130 किलोमीटरच्या वेगाने वाहन चालविण्याची अनुमती आहे. यामुळे देखील दुर्घटना होत असतात. ड्रायव्हिंगप्रकरणी असुरक्षित देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी आहे.
ड्रायव्हिंगप्रकरणी सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे दरवर्षी प्रति एक लाख चालकांमागे 2.7 लोकांचा रस्ते दुर्घटनेत मृत्यू होतो. नॉर्वेमध्ये वाहन चालविण्यासंबंधीचे नियम आणि कायदे अत्यंत कठोर आहेत. तसेच देशातील लोकांमध्ये अधिकार आणि कर्तव्याबद्दलची भावना अत्यंत जागरुक आहे. येथील जवळपास 95 टक्के लोक सीटबेल्ट घालूनच वाहन चालवितात. नॉर्वेनंतर जपानचा क्रमांक असून तेथील लोक अत्यंत शिस्तप्रिय मानले जातात.









