वृत्तसंस्था/ बेलग्रेड
सर्बियात खेळविण्यात येत असलेल्या नोव्हॅक जोकोव्हिक प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रीयाचा थिएम आणि सर्बियाचा क्रेजोनोव्हिक यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली.
रविवारी या स्पर्धेला सुमारे 4000 टेनिस शौकिन उपस्थित होते. पुरूष एकेरीच्या सामन्यात ऑस्ट्रीयाच्या थिएमने बल्गेरियाच्या डिमिंट्रोव्हचा सरळ सेटस्मध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता थिएम आणि क्रेजोनोव्हिक यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. सर्बियाच्या ट्रोस्कीचे आव्हान संपुष्टात आले आहे.









