ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
उत्तर कोरियात कठोर निर्बंध लादल्यामुळे आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण न आढळल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे. मात्र, शत्रू देशाकडून उत्तर कोरियात कोरोनाचा फैलाव केला जाण्याची भीती असल्याने हुकूमशाह किम जोंग उन यांनी देशांच्या सीमांजवळ बफर झोन तयार करण्यात आले आहेत. या बफर झोनमध्ये विना परवानगी फिरणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश जोंग यांनी दिले आहेत.
कोणतीही पूर्व सूचना न देता आपल्या देशाच्या सीमेबाहेरील हद्दीतील व्यक्तींना दिसताच गोळी मारण्याचा आदेश देणे हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचे उल्लंघन आहे. तरी देखील जोंग यांनी हा आदेश दिला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा दलाच्या मते, बळ व बंदुकांचा वापर करण्यापूर्वी अहिंसक साधनांचा अवलंब करणे आवश्यक आहे. आणि जर बंदुकांचा कायदेशीर वापर अटळ असेल तर अधिकाऱ्यांन संयम बाळगून निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा गोळी मारणाऱ्या सुरक्षा रक्षकांबरोबरच आदेश देणाराही दोषी असतो.