चंदगडहून कारमधून आलेले कुटुंबीय अचंबित
बेळगावः चंदगड ते बेळगाव असा प्रवास एका सापाने चक्क कारमधून केला. परंतु दुर्दैवाने त्याला आपला जीव गमवावा लागला. चंदगडचे एक कुटुंब कारमधून प्रवास करत बेळगावला आले.
कडोलकर गल्लीजवळ आल्यानंतर कारच्या मागील बाजूने धूर येत असल्याचे त्यांना जाणवले. घाबरलेल्या त्या कुटुंबीयांनी त्वरित कारमधून उतरून मागील दरवाजा उघडला. त्यावेळी तेथे मृत झालेला साप आढळून आला. कारच्या इंजिनाची धग सहन न झाल्याने कदाचित साप दगावला असण्याची शक्मयता व्यक्त करण्यात आली. केवळ सुदैव म्हणून चंदगड ते बेळगाव असा प्रवास करणाऱया सापाने कोणालाही इजा केली नाही किंवा हालचाल करून पुढील सीटवर येण्याचा किंवा बाहेर पडण्याचा प्रयत्नही केला नसावा. अन्यथा मोठा धोका निर्माण झाला असता.









