ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. कधी आपल्या गाण्यामुळे तर कधी आपल्या वक्तव्यामुळे. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस चर्चेत आल्या आहेत ते आपल्या अर्थसंकल्पावरील ट्विटमुळे.
सोमवारी देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. यानंतर अमृता फडणवीसांनी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्या ट्रोल होताना दिसत आहे. देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा 2020-21चा अर्थसंकल्प सोमवारी सादर केला. त्यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली.

त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आले नाही अशापद्धतीने अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल श्रीमती निर्मला सीतारामन यांचे आभार. कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे आता सर्व देश आपल्याकडून शिकतील.
अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमुळे ट्विटरवर ट्रोल आहेत. अनेक ट्विट करत नेटकऱ्यांनी त्यांना स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे झाली आहेत. तुम्ही 100 वर्षांचा दाखला कुठे देता? अशी टीका केली आहे.








