ऑनलाईन टीम / पुणे :
बुधवार पेठेसारख्या देहविक्रीय करणाऱ्या महिलांच्या भागात मोठया प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. महिलांचे वय वाढल्यानंतर त्यांना आरोग्य, दोन वेळचे पोट भरण्याची भ्रांत जाणवते. ती दूर करण्याचे काम करण्याची खरी गरज आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख किशोर चव्हाण यांनी व्यक्त केले.
जनता वेल्फेअर सोसायटी व प्रभात मित्र मंडळ गुरुवार पेठ यांच्यातर्फे देवदासी महिलांची आपुलकीची भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार पेठ पोलीस चौकीसमोरील शेटे मारुती मंदिर येथे करण्यात आले. यावेळी विजय शिवाजी मित्र मंडळाचे राजाभाऊ पवार, महाराष्ट्र तरुण मंडळाचे हनुमंत शिंदे, सोसायटीचे शरद शिंदे, विजय धोत्रे, मंडळाचे राजेंद्र भूतकर, केतन भागवत, मनोज शेलार, गौरव मयेकर, कुणाल जगताप आदी उपस्थित होते. देवदासी महिलांना 24 प्रकारचे साहित्य असलेले फराळ व धान्याचे किट देण्यात आले.
किशोर चव्हाण म्हणाले, दिवाळीची पणती प्रत्येक घरात लागावी, हा आमचा प्रयत्न आहे. यंदा अर्थव्यवस्था ढासळली, त्यामुळे मदतीचा हात देण्याची गरज होती. जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मंडळांचे काम सुरु आहे. सामाजिक कार्यात सातत्य राहिले, तर त्याचा उपयोग होईल,








