रेल्वे स्टेशन परिसरातील घटना, 10 दिवसांनी प्रकार उघडकीस
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरातील कार शोरूममधील कर्मचारी वेद प्रकाश खानोलकर (वय 27, रा. जगतापनगर) याला 7 मार्चला रात्री रेल्वे स्टेशन परिसरात तिघा अज्ञातांनी दांडक्याने मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वेदवर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. वेदच्या खून प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी संशयित माँटी उर्फ धनराज व्हटकर, आंsंकार आवळे, रोहीत भिंगारे या तिघांना अटक केली. संशयितांनी गुन्हÎात वापरलेली कार जप्त केल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः पाचगाव परिसरातील जगतापनगर जोतिर्लिंग कॉलनीत वेद प्रकाश खानोलकर हा आईवडील, मोठ्या भावासह राहतो. मोठा भाऊ मुंबइं&त नोकरीला आहे. वेद हा ताराराणी चौकातील एका कार शोरूममध्ये सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्यरत होता. रविवारी, 7 मार्चं रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ताराबाई पार्क येथील बीएसएनएल ऑफीस परिसरात वेद आला होता. यावेळी संशयितांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. डोक्यात दांडके लागल्याने संशयितांनी त्याला बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले होते. याची माहिती संशयितांनी त्याच्या वडिलांना दिली होती. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत, शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. फिर्यादीत वेदच्या वडिलांनी मारहाणीसंदर्भात माँटी व्हटकर व त्याच्या दोन मित्रांवर संशय व्यक्त केला होता. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक कटकधोंड करत आहेत.
वेद खानोलकर याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू असता मंगळवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी संशयित माँटी उर्फ धनराज प्रकाश व्हटकर (वय 31, रा. अयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर), ओंकार रवींद्र आवळे (वय 20) आणि रोहीत राहुल भिंगारे (वय 21, दोघे रा. कनाननगर) यांना बुधवारी सायंकाळी अटक केली. संशयितानी गुन्हÎात वापरलेली पांढरी कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
माँटी रेकॉर्डवरील गुन्हेगार, मारहाणीचे कारण अस्पष्ट
संशयित माँटी व्हटकर हा रेकॉर्डंवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापुर्वी 2016 मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा नोंद आहे. संशयित तिघांनी वेद खानोलकरला का मारहाण केली, याचे कारण अद्यापी समजू शकलेले नाही.
दरम्यान, तरूणाला मारहाण प्रकरणी संशयितांवर 307 चा गुन्हा दाखल झाला होता. वेदच्या मृत्यूनंतर संशयितांवर खुनाचा गुन्हा नोंद झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.









