मुंबई \ ऑनलाईन टीम
तौक्तेचा फटका कोकणातील समुद्र किनारपट्टीच्या भागाला तडाखा बसला आहे. तौक्ते चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळामध्ये केलेल्या नुकसानीसारखी मदत करणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तसेच या नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी 250 कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती दिली आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे. कोकणातील फळबागांचे नुकसान, नारळांचे नुकसान, शेतमालाचे, घरांची पडझड, बंदराचे नुकसान झाला आहे. याचा आता सविस्तर अहवाल प्राप्त झाला आहे. अहवालानुसार जर एनडीआरएफच्या निषामध्ये एकुण 72 कोटीचा दर एकुण नुकसानीचा दिसतो आहे. परंतु आम्ही असे ठरवले आहे की, निसर्ग चक्रीवादळाला जो जीआर काढला आहे तोच जिआर तौत्के चक्रीवादळाला लागू करण्यात यावा. त्यानुसार साधारणता 250 कोटी रुपये जसे निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना मदत केली होती तसेच एनडीआरएफच्या निकषापेक्षा 180 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीतून देऊन कोकणवासीयांना दिलासा द्यायचा, असा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी बैठक घेण्यात आली गुरुवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारला पत्र लिहून नुकसानग्रस्तांसाठी मदतीची मागणी केली असल्याचे देखील विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








