ओडिशातील मयूरभंज जिल्हय़ातील थरारक प्रकारामुळे खळबळ
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आपली नातेवाईक असणारी महिला जादूटोणा करते या संशयापोटी तिची शीर तोडून निर्घृण हत्या करण्याचा प्रकार एका नराधमाने केला आहे. तोडलेल्या शीरासह तो पोलिस स्थानकात स्वतःच हजर झाला. ही घटना ओडीशा राज्यातील मयूरभंज या जिल्हय़ातील नौसाही खेडय़ात सोमवारी घडली. तोडलेले शीर हातात घेऊन या नराधम व्यक्तीने 13 किलोमीटरचा प्रवास केला. त्याचे नाव बुधुराम सिंग असल्याचे समजते. त्याला अटक करण्यात आली आहे.
हत्या झालेल्या महिलेचे नाव चंपा सिंग असल्याचे सांगण्यात आले. चंपा सिंग ही आरोपीची जवळची नातेवाईक आहे. ती जादूटोणा करते असा त्याला संशय होता. केवळ या संशयाने त्याने तिला घरात एकटी असताना तीची हत्या केली. धारदार कोयत्याने तिचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर एका प्लॅस्टिकच्या पिशवीत रक्ताने माखलेले सीर घेऊन त्याने मोटरसायकलवरून 13 किलोमीटर प्रवास केला. तो स्वतः पोलीस स्थानकात उपस्थित झाला.
सरासरी 60 हत्या
चंपा सिंग हीची हत्या होत असताना अनेक बघ्यांची उपस्थिती होती. तथापी कोणीही तिला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. बुधुराम सिंग याने तिची घरातून बाहेर ओढून काढून हत्या केल्याचेही सांगण्यात येत आहे. ओडीशा राज्यात दरवर्षी जादूटोणा करण्याच्या संशयामुळे सरासरी 60 हत्या होतात अशी माहिती या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे.









