मित्राने देखील गमावला जीव
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेलगू चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली डिक्रूजचा भीषण कार दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. कारमधून ती मित्र राठौडसोबत होळी पार्टीनंतर घरी परतत असताना ही दुर्घटना घडली आहे. गायत्री केवळ 26 वर्षांची होती.
मॅडम सर मॅडम अंते या वेबसीरिजमुळे गायत्री चर्चेत राहिली होती. तिचा मित्र राठौड हा कार चालवत होता. भरधाव वेग असल्याने चालकाने कारवरील नियंत्रण गमाविले आणि ती दुभाजकला आदळून उलटली होती. गायत्रीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर राठौडने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.
गायत्री उर्फ डॉलीने इन्स्टाग्राम आणि युटय़ूबद्वारे मोठी प्रसिद्धी मिळविली होती. ती स्वतःचे युटय़ूब चॅनेल ‘जलसा रायुडू’द्वारे लोकप्रिय झाली होती. सोशल मीडियावर वाढत्य लोकप्रियतेनंतरच गायत्रीला वेबसीरिजची ऑफर मिळाली होती. गायत्री याचबरोबर अनेक लघुपटांमध्ये दिसून आली होती.









