लंडन :
मेक्सिको या देशाला वगळता अन्य प्रमुख देश कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्यासाठी तयार असल्याची माहिती तेल उत्पान संघटना ओsपेककडून शुक्रवारी देण्यात आली आहे. सदरचे देश मे आणि जून महिन्यातील उत्पादन प्रतिदिन एक कोटी बॅरेल इतकी कपात करण्यासाठीच्या निर्णयावर सहमत झाले आहेत. ओपेक आणि अन्य मुख्य तेल उत्पादन देशांनी किमतीमधील मोठय़ा प्रमाणात होणारी घसरण थांबविण्यासाठीची चर्चाही केली आहे. त्यानंतर उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले आहे. तेल उत्पादन करणाऱया देशांची ओपेककडून व्हिडीओ परिषद घेण्यात आली. यात जुलै ते डिसेंबर या कालावधीत 80 लाख बॅरेल प्रतिदिन उत्पादनात कपात करण्याचा करारावर एकमत झाले आहे. परंतु यात मेक्सिकोने सहमती दिलेली नाही.









