प्रा. रमेश आढाव / फलटण :
आपल्या स्वप्नांचे पंख पसरून अगदी कमी कालावधीत शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन ज्ञानाच्या प्रगतीचा कळस गाठण्यासाठी आकाशाला गवसणी घालताना लोकहिताचा निरंतर विचार करून शैक्षणिक क्षेत्रात आपला उल्लेखनीय ठसा उमटविणारे एक तेजस्वी, उत्साही, परखड, प्रेमळ आणि बाणेदार व्यक्तिमत्व म्हणजेच सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलच्या संचालिका संध्या विकास गायकवाड. गायकवाड या शहर व तालुक्यातील इंग्रजी माध्यमातील शैक्षणिक क्षेत्रात प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात.
हिम्मत व मेहनत या दोन अशा गोष्टी आहेत ज्या माणसाला कोणत्याही क्षेत्रात विजय मिळवून देतात. म्हणूनच म्हणतात कि, कष्टाने व प्रामाणिकपणे केलेले कोणतेही काम नेहमी यशस्वी होते. या उक्तीप्रमाणे प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलच्या संचालिका संध्या विकास गायकवाड यांना देखील आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण त्यांना सामोरे जाऊन मोठय़ा हिमतीने, विचाराने व सामंजस्याने प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना केला. जीवनात आलेल्या अनेक अडचणींना ठाम विचारांनी प्रत्येक गोष्टींचे निरसन केले. हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने करून दाखवले.
संध्याताईंच्या कर्तृत्वाबद्दल बोलताना बंधू विशाल यांचा ऊर भरुन आला होता. ते सांगतात की, ज्यांच्यावर स्वतः श्री स्वामी समर्थांचा वरदहस्त आहे अशा श्री. देशमुख काकांचा आशीर्वाद असलेल्या संध्या गायकवाड. संध्या गायकवाड या घरच्यांसाठी माता, पिता, भगिनी, बंधू, गुरु, सखा अशा वेगवेगळ्या अनेक भूमिका साकारतात. त्यांचे स्थान घरातील व्यक्तींसाठी उच्च आहे. विचाराने व मनाने मोठय़ा असलेल्या दीदी आम्हांस गुरुवर्य आहेत. आम्ही अस्वस्थ व्हावे अन् प्रेमाणे मायेची फुंकर घालावी अशा प्रेमळ आमच्या दीदी आहेत. सातत्य, जिद्द, परिश्रम, चिकाटी व परिश्रम या गुणांमुळे त्यांना यश जणू लोटांगणच घालत असते. प्रामाणिक लोकांच्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देव त्यांची नाव कधीही बुडू देत नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय हार स्वीकारायची नसते. कारण प्रत्येक कष्टाचे फळ हे गोडच असते असे प्रेरणादायी वाक्य दीदी नेहमी म्हणतात.
पावलोपावली येणाऱ्या अडचणींना त्या आपल्या शांत वृत्तीने सोडवतात. कितीही अडचणी असल्या तरी त्या मला वेळ देऊन माझ्या विचारांना चालना देण्याचे प्रेरणादायी कार्य करतात. त्या सर्वांच्या प्रेरणास्थान आहेत. म्हणूनच शाळेच्या माध्यमातून त्या आपल्या विचारांची सुरेख अशी रांगोळी घालतात. शाळेचे कार्य हे सकारात्मक विचारांनी साकारतात. शाळा चालविणे त्यातून दोन- दोन शाखा वाटते तेवढे सोपे कार्य नाही त्यांनी शाळेला जणू वाहूनच घेतले आहे. शाळा चालवताना कोणतीही उणीव जाणवू देत नाहीत. समाधानी वृत्ती, अथक परिश्रम, निष्ठा, दृढ विश्वास या सर्व गोष्टी यामुळे त्या सर्वांची मने जिंकतात यातूनच त्यांनी आपले प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण केले आहे. सूर्याच्या किरणाचा प्रकाश जसा आशेची लाट पसरवितो तसे दिदींचे आमच्या जीवनातील स्थान आहे, असे बंधू विशाल सांगतात.
चालण्या बोलण्यातला स्पष्टपणा, व कार्य करून दाखविण्यातला कर्तृत्वपणा असे खंबीर व्यक्तिमत्व म्हणजे संध्याताईंच्या विचारांची प्रगल्भता व मनाचा मोठेपणा, वक्तशीर आणि काटेकोर असे वर्चस्व या गोष्टींमुळे त्यांचे स्थान उंचावते. त्यांनी मांडलेल्या मुद्देसूद विचारांनी समोरच्या व्यक्तीवर पडलेली छाप या गुणांचा अभिमान वाटतो. सकारात्मक विचार अन् स्वत: वर असलेल्या विश्वासाने त्यांनी सर्वांची मने जिंकली आणि एक पाठोपाठ एक स्वप्न साकार केली आहेत. अशा आधुनिक युगातील नवदुर्गेच्या कार्याला सलाम.