अभिनेत्रांना नेहमीच वेगवेगळ्या कॉम्प्लिमेंट मिळत असतात.. तुझी स्माईल खरचं खूप छ़ान आहे. तुझे लुक्स किती गोड आहेत. तुझी पर्सनॅलिटी किती भारी आहे, तर तुझे डोळे किती बोलके आहेत. अभिनेत्री तेज़श्रीला नेहमी ही कॉम्प्लिमेंट मिळते की तिचे डोळे खूप छान आहेत.
आता इतकी स्तुती झाल्यावर तेजश्रीलाही आनंद होणारच ना. तेजश्रीलाही तिचे डोळे खूप आवडतात. तिच्यानंतर कुणीतरी तिच्या डोळय़ांनी हे जग पहावं असही तिला वाटतं आणि म्हणूनच तिने नेत्रदान करण्याचा संकल्प सोडला आहे. ती नेत्रदान करणार आहे. तेजश्रीच्या या संकल्पाचे खूपच कौतुक होत आहे.
आपल्याकडील सुंदर गोष्ट जर कुणासाठी मौल्यवान ठरणार असेल तर ते आहेत डोळे. ज्यांना डोळे नाहीत त्यांना हे जग पाहता येत नाही, हा विचार तेजश्रीला अस्वस्थ करतो. आपण समाजासाठी काय करू शकतो हा विचार करताना तेजश्रीच्या आयुष्यातील सर्वात आवडती गोष्ट असलेले तिचे डोळेच दान करावे असे वाटले आणि तेजश्रीने हा निर्णय घेतला आहे. सक्षम नावाच्या एका सामाजिक संस्थेचे नेत्रदानातील काम मोठे आहे. या संस्थेच्या माध्यमातून तेजश्रीने नेत्रदानाचा संदेश देत असताना केवळ तो सेलिब्रिटीचा जाहिरात करणारा संदेश वाटणार नाही तर मी स्वतःही नेत्रदान करणार आहे, असं सांगत तेजश्रीने नेत्रदानाचा निर्णय घेतला आहे.
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील जान्हवी या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेची ऑफर आली आणि चार वर्षांनंतर तेजश्री शुभ्राच्या प्रेशलूकमध्ये चाहत्यांसमोर आली. लवकरच ती अभिनेता शर्मन जोशीसोबत हिंदी सिनेमात झळकणार आहे.
एकीकडे तेजश्रीचा अभिनयातील प्रवास छान गतीने सुरू असताना तिने आयुष्यात अनेक अनुभवही घेतले. त्यातूनच तिने नेत्रदानाचा संकल्प केला. तेजश्रीने नेत्रदानाचा ऑनलाइन फॉर्मही भरला आहे. सध्या तरी तेजश्री सक्षम या संस्थेसाठी नेत्रदान करण्याचा संदेश तिला फॉलो करणाऱया सर्वांना देतच आहे. पण तिनेही मी नेत्रदान करणार अशी गाठ बांधली आहे.
तेजश्रीचे डोळे घेऊन जी व्यक्ती हे जग पाहील ती नक्कीच नशीबवान असेल, अशा शब्दात तिच्या चाहत्यांनी तेजश्रीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.









