लालूप्रसाद यादवांच्या आमदारपुत्राचा दावा
वृत्तसंस्था/ पाटणा
राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांना सध्या स्वप्नांमध्ये भूत दिसून येत आहे. हे भूत त्यांचे भाषण ऐकण्यासाठी येत असते. तेजप्रताप यांनी फेसबुक लाइव्हदरम्यान हा विचित्र दावा केला आहे.
स्वप्नात हसनपूरमधीरल पूरग्रस्त भागाचा दौरा केल्याचे दिसले. या दौऱयादरम्यान एका झाडावर बसलेले भूत आम्हाला पकडण्यास येत होते. महादेवाचे नाव घेताच स्वप्नामधील या भूताने घाबरून भाषण ऐकण्यासाठी आल्याचे सांगितले. मी जेव्हा भाषण करत असतो, तेव्हा लालूप्रसाद बोलत असल्याचे वाटते असे लोक सांगतात असे उद्गार तेजप्रताप यांनी काढले आहेत.
राजकीय नेते खादीचे नवे कुर्ते-पायजमा शिवून घेतात आणि चार्लीचा परफ्यूम वापरतात, मग त्यांना नेता झाल्याचे वाटू लागते. नेता होण्याची संघर्ष करावा लागत असतो. आम्ही विद्यार्थी आणि युवांना रस्त्यावर संघर्ष करताना पाहू इच्छितो. सध्याच्या शासनकाळात शिक्षणाच्या नावावर घोटाळा होत असल्याचे तेजप्रताप म्हणाले.
7 ऑगस्ट रोजी जातीय जनगणनेवरून आंदोलन होणर आहे. लालूप्रसादांनी जयप्रकाशांना वाचविण्यासाठी लाठीचा मार खाल्ला. आम्हा सर्वांना देखील आता लढायचे-भिडायचे आहे. अनेक जण सत्ता मिळताच त्याचा गैरवापर करतात, अशा लोकांना रोखले जावे असे तेजप्रताप यांनी म्हटले आहे.









