वृत्तसंस्था / कोलकाता
तृणमूल काँग्रेसचे नेते अनुव्रत मंडल यांची कन्या सुकन्या मंडलला ईडीकडून बुधवारी अटक करण्यात आली आहे. अनुव्रत मंडल यांना सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच अटक केली होती. ईडीने पशू तस्करीप्रकरणी सुकन्या मंडल यांची चौकशी केल्यावर त्यांना अटक केली आहे.
यापूर्वी सुकन्या मंडल यांना बेहिशेबी मालमत्ता आणि त्यांच्याशी निगडित बँक खात्यांवरून चौकशीसाठी बोलाविले होते. सुकन्या मंडल या राज्य सरकारकडून संचालित प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेने सुकन्या यांना समन्स बजावून 15 मार्च रोजी नवी दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु सुकन्या यांनी आरोग्याचे कारण सांगत उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविली होती.









