भगवान महादेव श्रीकृष्णाची स्तुती करताना पुढे म्हणाले –
तूं केवळ अद्वितीय । भेदरहित अप्रमेय ।
सजातीय विजातीय । भेद अन्वय तुज नाहीं ।
भेद नाहीं कां पां म्हणसी । तूं सर्वांचा हेतु होसी ।
स्वयें अहेतु निर्विशेषीं । तुज कायसी भेदकुटी ।
तूं जरी म्हणसी प्रतिशरीरिं । जीवभेद कवणेपरी ।
प्रतीतिगोचर होती तरी । तें अवधारिं जगदीशा ।
इंधन व्यापूनि हुताशन । दहन पचन प्रकाशन ।
करी तैसाचि तूंही जाण । प्रकटिसी गुण स्वप्रकाशें ।
जीवावच्छिन्न चैतन्यमात्र। स्वप्रत्ययें कवळिसी गात्र। तैं करणज्ञानें विषांसारिकसम मीही । ऐसें सहसा न म्हणें हरि ।दृष्टान्तरूपें मम वैखरी । वदते तेंही श्रवण करिं । असंसारी बोधावया ।
श्रीकृष्णाचे स्तवन करताना भगवान महादेव म्हणतात – आपण सजातीय, विजातीय आणि स्वगतभेदरहित, एकमेव आणि अद्वितीय असे आदिपुरुष आहात. तुर्यतत्व आपणच आहात. आपण स्वयंप्रकाश आहात. आपण सर्वांचे कारण आहात, परंतु आपले कोणीही कारण नाही. असे असूनही आपण तिन्ही गुणांचे वेगळेपण प्रकाशित करण्यासाठी आपल्या मायेने देव, पशु-पक्षी, मनुष्य इत्यादी शरीरांनुसार वेगवेगळय़ा रूपाने प्रतीत होता.
मेरूरूप जे सूर्यच्छाया ।
सूर्याप्रति आच्छादूनियां ।
अपरदृष्टीच्या ज्ञानविषया ।
लोपक ऐसी भासतसे ।
तथापि मेघच्छायेकरून ।
सूर्या नोहे तिरोधान ।
कैसें म्हणसी तें लक्षण ।
सावधान अवधारिं ।
सूर्य स्वच्छायाच्छादित झाला ।
तऱही प्रकाशी त्या मेघाला ।
तदंतरितपदार्थाला ।
स्वआस्तिक्मये प्रकाशी ।
सूर्य निःशेष नाहींच होता । तरी कें मेघां दावूं शकता। घटमठादिपदार्थां बहुतां । प्रकाशकता मग कैंची । तूंही स्वगुणें याचि प्रकारें । जीवात्मदेहात्माहंकारें । छादित अतज्ञ मानिती खरें। परि त्यां न स्फुरें तव तेज । आच्छादिलें हें जाणती । त्या जाणण्याची प्रकाशशक्ति । पृथक्त्वादि गुणप्रवृत्ति । प्रकाशती तव तेजें ।
स्वप्नामाजी कोण्ही मेला। तो मरणाचा प्रकाशक झाला । तेंवि तूं सन्मात्र स्वकार्याला । आवृत गमसी अनावृत । कोण्ही उन्मत द्रव्य सेवी । तो भुलला उपाधिभावीं । परि मी भुललों हे स्वजीवीं । प्रतीति ठावी कीं ना त्या ।
एवं उपाधिअंतर्गत । स्वप्रकाशें सदोदित ।
आत्मसन्मात्र तूं संतत । तुज कें लिप्त संसार ।
सर्व साक्षी सर्वातीत । असंग अद्वय अनासक्त । त्या तुज संसाराची मात । कोनें किमर्थ वदिजेल । भूमन् भो भो अपरिच्छिन्ना। तुझा आश्रय मायागुणा । माया भुलवी गौणजना। तुझिया आश्रयें करूनियां। तवाश्रयें त्रिजग मोही। गुणावृत जीवा संसारडोहीं। बुडवितो तुज संसार नाहीं । म्हणणें कांहीं लागतसे । तवाश्रयें माया भुलवी जना । द्योतूनि गुणात्मकाभिमाना । कैसी ते तूं जनार्दना । सावधान अवधारिं ।
Ad. देवदत्त परुळेकर








