प्रतिनिधी /बेळगाव
तुळशी विवाहांना सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर तुळशीच्या विवाहासाठीचे साहित्य आणि तुळशी कुंडय़ा उपलब्ध आहेत. शहरासह उपनगरांतील रस्त्याशेजारी तुळशीच्या कुंडय़ांची विक्री होत आहे.
तुळशी विवाहानंतर विवाहमुहूर्त साधले जातात. अंगण किंवा परसात तुळशी वृंदावनाची पूजा केली जाते. बाजारात विविध आकारातील तुळशी कुंडय़ा दाखल झाल्या आहेत. तुळशी विवाहरंभाला प्रारंभ झाल्याने विविध रंगांच्या कुंडय़ांना मागणी वाढली आहे. मागील काही दिवसांपासून नागरिक तुळशी कुंडय़ा खरेदी करताना दिसत आहेत.
मोठय़ा तुळशी कुंडय़ांचा दर 600 ते 1200 तर लहान तुळशी कुंडय़ांचा दर 500 ते 600 रु. आहे. तुळशीच्या विवाहासाठी लागणारे साहित्यही बाजारात उपलब्ध आहे.









