प्रतिनिधी / तुळजापूर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 4 एप्रिल 2019 रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार श्री तुळजाभवानी देवीजींच्या मंदिरात दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी रात्री आठ वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात येत असल्याचे परिपत्रक मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार यांनी प्रसिद्ध केले आहे.
दैनंदिन नित्योपचार पूजा या पुर्वी प्रमाणे महंत पुजारी व मानकर यांच्या हस्ते होणार आहेत सदर साथीच्या आजारांचे गांभीर्य विचारात घेता भाविकांची श्रीदेवीची वरील नितांत श्रद्धा इतकीच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे या उद्देशाने सदरचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासन आदेशाप्रमाणे संयुक्तरीत्या घेण्यात आला आहे. भाविकांनी महाराष्ट्र शासन व माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे योग्य ती खबरदारी घेऊन कोरोना संसर्ग रोग मंदिर प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती केली आहे. तसेच या काळात भाविकांनी श्री देवींचे ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा असे आव्हान मंदिर प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.