वृत्तसंस्था/ अंकारा
कोरोना महामारीमुळे तुर्कीतील फुटबॉल स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता 12 जूनपासून तुर्कीतील फुटबॉल लीग स्पर्धेला पुन्हा सुरूवात केली जाणार असून जुलैअखेरपर्यंत फुटबॉल हंगाम पूर्ण करण्याचा निर्धार तुर्कीच्या फुटबॉल फेडरेशनने व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे येत्या ऑगस्टमध्ये चॅम्पियन्स लीग फुटबॉल अंतिम स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यासाठी तुर्कीचे प्रयत्न सुरू असल्याचे फेडरेशनच्या अध्यक्षानी पत्रकार परिषदेत सांगितले.









