प्रतिनिधी/ पणजी
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत गोवा राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात येणाऱया सर्व रेशनकार्डधारकांना प्रति माणसी 5 किलो एवढा अतिरिक्त धान्य कोटा तीन महिन्यांसाठी मोफत देण्यात येणार आहे.
एप्रिल ते जून 2020 या तीन महिन्यात हा साठा मिळणार आहे. नागरी पुरवठा खात्याचे संचालक सिद्धीविनायक नाईक यांनी सदर माहिती पत्रकातून दिली आहे. येत्या दि. 8 एप्रिलपासून हा धान्याचा कोटा दिला जाणार आहे. एफव्हाय व पीएचएच या कार्डधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. अनेकांना धान्य मिळविणे अवघड होत असून गावागावातील रेशन धान्य दुकानातून ते देण्याची व्यवस्था कायद्याअंतर्गत हजारो कार्डधारक असून त्या सर्वांना त्याचा लाभ होणार आहे.
कोरोनाचा प्रभाव देशभर वाढत असल्याने गोव्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन चालू आहे. तेव्हा सर्वांपर्यंत धान्य पोहोचावे म्हणून ही सोय करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.









