प्रतिनिधी / कागल
परराज्यातून महाराष्ट्रात येताना कोणताही परवाना न घेता शहरात प्रवेश केल्याप्रकरणी कागल नगरपरिषदेने तीघा परप्रांतीय कामागारांसह एका कारखानदारावर गुन्हा दाखल केला आहे . तसेच त्यांची तपासणी करून कारखानदाराच्या ताब्यात देण्यात आले आहे .कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमधील एका कारखानदाराने उत्तरप्रदेशातील दोघा कामगारांना बोलावून घेतले आहे. महमंद अफताब अन्सरी वय ३३ आणि समशद सुलेमान अन्सारी वय ३२ अशी त्यांची नावे आहेत .
शुकवारी हे दोघेजण कागल शहरात आले होते. शहरात आल्यानंतर दोघेजण थेट कारखान्यात कामावर हजर झाले . परराज्यातून कर्मचारी शहरात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला समजली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडं चौकशी केली . त्यांनी कोणताही परवाना न घेता उत्तरप्रदेशातून थेट राज्यात प्रवेश केल्याचे आढळून आले . त्यामुळे पालिकेने संबंधित कारखानदारासह दोघा परप्रांतिय कामगारांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
अशाच प्रकारे उत्तरप्रदेशातून शहरात आलेल्या कुमारमंगलम दिपनारायण दुवे वय ३५ यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या चौघांनीही वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणून निष्काळजीपणे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे पोलीसांनी चौघांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन २००५ चे कलम ५१ अंतर्गत साथीचे रोग अधिनियम १९८७ चे कलम २.३ आणि ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Previous Articleअजय देवगनच्या मावळय़ाने सांगितला नैराश्यावर मात करण्याचा मार्ग
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये नव्या ४३ कोरोना रुग्णांची भर









