ग्रामीण भागात मजबूत पकड : रिटेल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म बिजोमच्या अहवालामधून स्पष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील विविध टप्प्यावरील परिस्थिती सुधारत असून यामध्ये विक्रीचा टप्पाही मजबूत होत असल्याचे मागील काही आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. यामध्ये साबणासह दररोज वापरात असणाऱया उत्पादनांची (एफएमसीजी) निर्मिती करणाऱया कंपन्यांची विक्री वधारली असल्याची माहिती आहे.
यामध्ये डिसेंबर तिमाहीत एफएमसीजीची विक्री ही 19.6 टक्क्यांनी वधारली आहे. पूर्व राज्यांमध्ये एफएमसीजी क्षेत्राने विक्रीमध्ये सर्वाधिक वाढ नेंदवली असल्याची माहिती रिटेल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म बिजोमच्या आकडेवारीतून स्पष्ट करण्यात आले आहे.
एफएमसीजी क्षेत्रामध्ये ग्रामीण भागाची मोठी हिस्सेदारी राहिली आहे. यात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान शहरांमध्ये एफएमसीजीची विक्री काहीशी सुस्त राहिली होती. यासोबतच कोरोना महामारीसह लॉकडाऊनमुळे अनेकजण मोठय़ा शहरांमधून आपापल्या गावी परतल्यामुळे नवे रोजगार निर्मिती होत ग्रामीण भागात मोठय़ाप्रमाणात एफएमसीजीचे क्षेत्र बहरले असल्याचेही बिजोमच्या अहवालामधून नमूद करण्यात आले आहे.









