प्रतिनिधी/तासगाव
तासगावातील मुख्य पोस्ट ऑफिस नजीक राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला आहे.या प्रकरणी अज्ञाता विरूध्द तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्मला खंडू उर्फ अजय हरी चव्हाण,वय-32,रा.तासगाव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.त्या पती पासून विभक्त राहत होत्या.त्यांना दोन मुले आहेत.
सोमवारी दुपारी त्या रहात्या घरातून बाहेर गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह वासुंबे गावचे हद्दीतील आरफळ योजनेच्या कालव्या जवळ आढळून आला.याबाबत ची माहिती नागरिकांनी पोलीसांना दिली.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, यांचेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
याप्रकरणी मयत महिलेच्या आईनी अज्ञाता विरूध्द दिलेल्या फिर्यादीवरून तसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तासगावातील एका संशयीतास ताब्यात घेण्यात आले असून हा खून अनैतिक संबंधातून झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.








