तासगाव शहरात दिलासादायक चित्र मंगळवारी एक रुग्ण.
तासगाव-प्रतिनिधी.
तासगाव शहरासह तालुक्यात मंगळवारी एका दिवशी आत्तापर्यंत सर्वाधिक असे 148 जण कोरोनामुक्त झाले.तर तालुक्यात 24 कोरोना बाधित रूग्ण सापडले.
तालुक्यातील मंगळवारचे रूग्ण असे….मणेराजुरी-2,आरवडे-2, सावळज-3,हातनूर-4,धामणी-2, विसापूर-2,तसेच तासगाव,सिध्देवाडी,खुजगाव, पेड, लिंब,येळावी, नेहरूनगर, कवठेएकंद, तुरची,येथे प्रत्येकी एक असे एकूण 24 रूग्ण सापडले आहेत.
तालुक्यात सोमवारी काही प्रमाणात रूग्ण संख्या वाढलेनंतर मंगळवारी पुन्हा रूग्ण संख्या कमी होऊन दिलासा दायक चित्र पाहवयास मिळालेले आहे.सोमवारी 33 रूग्ण सापडले होते तर मंगळवारी 24 रूग्ण सापडले आहेत.तासगाव शहरात सोमवारी सहा रूग्ण सापडले होते तर मंगळवारी एक रूग्ण सापडला आहे.
Previous Articleसांगली जिल्ह्यात नवे 288 तर 492 कोरोनामुक्त
Next Article निराशा ही आशेची छोटी बहीण आहे








